आपला जिल्हाक्रीडा

सोलापुरात २१ ते २२ जुलैदरम्यान जिल्हास्तरीय सुब्रोतो कप फुटबॉल स्पर्धा; २० जुलैपर्यंत नोंदणी व प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क : सोलापूर प्रतिनिधी : परशुराम गायकवाड|

दि. १४ जुलै २०२६,

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर आणि जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६-२७ या वर्षातील जिल्हास्तरीय सुब्रोतो कप फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन २१ व २२ जुलै २०२६ रोजी वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर येथे करण्यात आले आहे.

या स्पर्धेत १५ वर्षांखालील मुले तसेच १७ वर्षांखालील मुले व मुली हे गट सहभागी होणार आहेत.स्पर्धेसाठी १५ वर्षांखालील गटातील खेळाडूंचा जन्म १ जानेवारी २०१२ किंवा त्यानंतरचा, तर १७ वर्षांखालील गटातील खेळाडूंचा जन्म १ जानेवारी २०१० किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे.स्पर्धेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :२१ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता १५ वर्षांखालील मुलांचे आणि १७ वर्षांखालील मुलींचे सामने.२२ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता १७ वर्षांखालील मुलांचे सामने.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांनी Subroto Cup Sports Education Society च्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य असून, २० जुलै २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. तसेच १५ वर्षांखालील खेळाडूंना एआयएफएफ (AIFF) मान्यताप्राप्त Skeleton Maturity Age Determination Test पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे.

स्पर्धेच्या प्रवेशिका २० जुलै २०२६ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत किंवा dsosolapur1@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. प्रकाश मोहारे यांनी केले आहे.

स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी श्री. किरण दुस्तकर सर (मो. ८७८८१९२१२४) तसेच मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी श्री. दत्तात्रय केशव वरकड सर (मो. ७२१९१५५२५२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील शाळांनी व फुटबॉल संघांनी वेळेत नोंदणी करून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असेही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

महाभारत न्युज लाईव्ह

'महाभारत न्यूज लाईव्ह' हे महाराष्ट्रातील अतिशय वेगाने लोकप्रिय होत असलेले एक विश्वासार्ह व जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज नेटवर्क आहे. अल्प कालावधीतच सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या न्यूज नेटवर्कने आपल्या निर्भीड पत्रकारिता, तळागाळातील प्रश्नांवरील भक्कम मांडणी आणि जनसामान्यांच्या हक्कासाठी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे विशेष ओळख निर्माण केली आहे. ग्राउंड लेव्हलवरील वास्तव परिस्थिती पासून ते प्रशासनाच्या दालनापर्यंत सामान्य नागरिकांचा आवाज पोहोचवण्याचे कार्य महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क सातत्याने करत आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, विज्ञान तंत्रज्ञान, सांस्कृतिक, क्रीडा, गुन्हेगारी विश्व, विकासकामे तसेच जनहिताच्या विविध विषयांवरील बातम्या अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी पद्धतीने जनतेसमोर मांडणे हेच महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क चे मुख्य ध्येय आहे. सत्य, न्याय, विवेक आणि जनसेवा या मूल्यांवर आधारित पत्रकारितेमुळे महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क हे आज सामान्य जनतेच्या विश्वासाचे व्यासपीठ बनले आहे. निर्भीड पत्रकारिता • जनतेचा आवाज • न्यायासाठी संघर्ष• महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क | मुख्य संपादक : भारत जगताप मो. ७७२१००८८८५

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button