आपला जिल्हामहाराष्ट्रविशेषसामाजिक

बबनदादा शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त उंबरे(वे.) येथे भव्य रक्तदान शिबिर;युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क|माळशिरस तालुका प्रतिनिधी: शशिकांत सरतापे| दि. १३ सप्टेंबर, २०२६.

उंबरे (वे.) ता. माळशिरस : माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन मा. आ. श्री. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त उंबरे (वेळापूर) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री. नवनाथ पवार युवा मित्र मंडळ, माळशिरस तालुका यांच्या पुढाकाराने व संयोजनातून पार पडलेल्या या सामाजिक उपक्रमाला युवक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंबरे (वे.) येथे रक्तदान शिबिर पार पडले. शिबिरामध्ये अनेक तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान करणाऱ्या युवकांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

रक्तदान शिबिराच्या माध्यमातून ‘रक्तदान, जीवनदान’ हा अत्यंत महत्त्वाचा सामाजिक संदेश देण्यात आला. एखाद्या गरजू रुग्णाला वेळेवर रक्त उपलब्ध होणे म्हणजे त्याच्यासाठी जीवनाची नवी आशा ठरू शकते. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छा किंवा सत्कार न करता समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न या शिबिरातून करण्यात आला.

या प्रसंगी माढा मतदारसंघाचे युवा नेते चि. कृष्णा दादा रणजीतसिंह भैय्या शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच श्री. नवनाथ पवार, (अध्यक्ष, रणजीतसिंह भैया शिंदे युवा मंच, सोलापूर जिल्हा), ॲड. सुदर्शन शेळके (प्रगतशील शेतकरी), सुनील गायकवाड (युवा उद्योजक), शिवाजी थिटे, हरिदास गायकवाड (माजी चेअरमन, उंबरे विविध कार्यकारी सेवा सोसायटी, उंबरे-वे.), राजेंद्र थिटे (संचालक, उंबरे विविध कार्यकारी सेवा सोसायटी, उंबरे-वे.), सोमनाथ पवार (दिंडी मालक, जय हनुमान प्रासादिक दिंडी, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा), दीपक थिटे साहेब (विठ्ठलराव शिंदे कारखाना, टाईम ऑफिस), संतोष पवार, पांडुरंग पवार, प्रताप भोसले (मालक, श्री सिद्धनाथ कृषी ॲग्रो), गजानन भोसले, ज्ञानेश्वर गुंडीबा थिटे, बिट्टू केचे, विशाल भोसले, सुनीलराज थिटे (मालक, विजयराज कंट्रक्शन) यांच्यासह उंबरे (वेळापूर) गावातील तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या युवकांनी समाजातील गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला. प्रत्यक्ष रक्तदान करणारे युवक, त्यांची तपासणी व रक्तसंकलनाची प्रक्रिया तसेच शिबिरासाठी उभारण्यात आलेली व्यवस्था या उपक्रमाचे सामाजिक स्वरूप अधोरेखित करणारी ठरली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या. रक्तदान करणाऱ्या नागरिकांचा आणि या उपक्रमासाठी परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.

“वाढदिवस साजरा करण्याच्या अनेक पद्धती असतात; मात्र एखाद्याच्या आयुष्यात उपयोगी पडणारे रक्तदान करून वाढदिवसाला सामाजिक सेवेची जोड देणे, हीच खऱ्या अर्थाने समाजाभिमुख वाटचाल आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. उंबरे येथे आयोजित या रक्तदान शिबिरामुळे गावातील युवकांची संघटनात्मक ताकद, सामाजिक जाणीव आणि सेवाभावी वृत्ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली. वाढदिवसाच्या निमित्ताने राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला असून, ‘रक्तदान करा, जीवन वाचवा’ हा संदेश गावोगावी पोहोचविण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली. रक्तदानातून माणुसकी जपणाऱ्या या उपक्रमाला सलाम!

महाभारत न्युज लाईव्ह

'महाभारत न्यूज लाईव्ह' हे महाराष्ट्रातील अतिशय वेगाने लोकप्रिय होत असलेले एक विश्वासार्ह व जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज नेटवर्क आहे. अल्प कालावधीतच सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या न्यूज नेटवर्कने आपल्या निर्भीड पत्रकारिता, तळागाळातील प्रश्नांवरील भक्कम मांडणी आणि जनसामान्यांच्या हक्कासाठी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे विशेष ओळख निर्माण केली आहे. ग्राउंड लेव्हलवरील वास्तव परिस्थिती पासून ते प्रशासनाच्या दालनापर्यंत सामान्य नागरिकांचा आवाज पोहोचवण्याचे कार्य महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क सातत्याने करत आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, विज्ञान तंत्रज्ञान, सांस्कृतिक, क्रीडा, गुन्हेगारी विश्व, विकासकामे तसेच जनहिताच्या विविध विषयांवरील बातम्या अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी पद्धतीने जनतेसमोर मांडणे हेच महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क चे मुख्य ध्येय आहे. सत्य, न्याय, विवेक आणि जनसेवा या मूल्यांवर आधारित पत्रकारितेमुळे महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क हे आज सामान्य जनतेच्या विश्वासाचे व्यासपीठ बनले आहे. निर्भीड पत्रकारिता • जनतेचा आवाज • न्यायासाठी संघर्ष• महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क | मुख्य संपादक : भारत जगताप मो. ७७२१००८८८५

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button