अकलूजआपला जिल्हामहाराष्ट्रशहर

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपंचायत,नगरपरिषद, ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणनीती संदर्भात शिवसेना-युवासेना पदाधिकाऱ्यांची अकलूजमध्ये विशेष आढावा बैठक संपन्न

अकलूज येथील भव्य दहीहंडी कार्यक्रम व गणेशोत्सवाच्या नियोजनावरही मंथन

महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क|माळशिरस तालुका प्रतिनिधी: शशिकांत सरतापे|

दि. २७ ऑगस्ट २०२६,

शिवसेना-युवासेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपंचायत, नगरपरिषद व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभावी रणनीती आखणे, नियोजित दहीहंडी महोत्सव तसेच गणपती उत्सवाच्या निमित्ताने आयोजीत करण्यात येणारे सामाजिक उपक्रम या संदर्भातही नियोजन करणेबाबत शासकीय विश्रामगृह, अकलूज येथे शिवसेना-युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक युवासेना माळशिरस विधानसभा संपर्कप्रमुख विजय भाऊ कोकणे यांच्या नियोजनाखाली आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब तसेच खा. डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेब, युवासेना प्रमुख मा. पूर्वेशजी सरनाईक, सचिव मा. किरणदादा साळी यांचे आदेशानुसार, तसेच शिवसेना माढा लोकसभा संपर्क प्रमुख पै. मा. चंद्रहार दादा पाटील व युवासेना माढा लोकसभा संपर्क प्रमुख मा. सुजित भैय्या खुर्द यांचे मार्गदर्शनाखाली आगामी ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगरपरिषदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, वरिष्ठांच्या सूचनेनुसार रणनीती तयार करण्यात आली आहे.

युवासेना माढा लोकसभा संपर्कप्रमुख मा. सुजित भैया खुर्द व युवासेना माळशिरस विधानसभा संपर्कप्रमुख मा. विजय भाऊ कोकणे यांच्या आवाहनानुसार व नियोजनाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात धर्मवीर स्व. आनंदजी दिघे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी आगामी नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, बूथनिहाय संघटन मजबूत करणे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे तसेच आगामी निवडणुकांसाठी आवश्यक राजकीय रणनीती व नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनसंपर्क वाढवून पक्षाची भूमिका सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबाबतही बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. संघटन मजबूत असेल तर आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला अधिक प्रभावीपणे काम करता येईल, या दृष्टिकोनातून विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.

यासोबतच अकलूज येथील नियोजित भव्य दहीहंडी महोत्सव तसेच गणपती उत्सवाच्या निमित्ताने आयोजीत करण्यात येणारे सामाजिक उपक्रम या संदर्भातही विशेष चर्चा करण्यात आली. हे दोन्ही उत्सव उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या, कार्यक्रमाचे नियोजन आणि आवश्यक पूर्वतयारी याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

“महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब तसेच खा. डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेब, युवासेना प्रमुख मा. पूर्वेशजी सरनाईक, सचिव मा. किरणदादा साळी यांचे आदेशानुसार, तसेच शिवसेना माढा लोकसभा संपर्क प्रमुख मा. पै. चंद्रहार दादा पाटील व युवासेना माढा लोकसभा संपर्क प्रमुख मा. सुजित भैय्या खुर्द यांचे मार्गदर्शनाखाली आगामी नगरपंचायत व नगरपरिषदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, वरिष्ठांच्या सूचनेनुसार रणनीती तयार केली आहे. याचाच भाग म्हणून युवा सेनेची माळशिरस विधानसभा क्षेत्रामधील संघटन बांधणी मजबूत करण्यासाठी ‘गाव तेथे शाखा’ हा उपक्रम माळशिरस विधानसभा क्षेत्रात अधिक जोमाने व उत्साहाने राबवण्याचा मानस आहे. तसेच आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.”

– विजय भाऊ कोकणे, युवासेना माळशिरस विधानसभा संपर्कप्रमुख

या बैठकीस युवासेनेचे आबासाहेब वाघमारे, ओबीसी जिल्हाध्यक्ष राजकुमार हिवरकर, जिल्हा उपाध्यक्ष दीपक खंडागळे, ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भीमराव भुसनर, ज्योतिराम जाधव, गुलाब वाघमारे, निशांत कांबळे, शहाजी काळे, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी साठे, तालुकाध्यक्ष रोहिणीताई सुनील आहेर, नीताताई शिंदे तसेच तानाजी जाधव, अविनाश धाईजे, समर्थ जावीर, जयभैय्या निचळ, महादेव बाबर, भैय्यासाहेब गवळी, सचिन साठे, अनिकेत झेंडे, कैफ शेख, राज काकडे, स्वप्नील निचळ, आप्पा ससाणे, आदित्य कांबळे, प्रिन्स बनसोडे, रणजीत ननवरे, प्रसाद नवगिरे, पप्पू सय्यद, अजय पाटील, नवनाथ जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-युवासेनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनानुसार आगामी काळात संघटन विस्तार, जनसंपर्क आणि निवडणूक नियोजनाला अधिक वेग देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अनुषंगाने माळशिरस विधानसभा क्षेत्रातील शिवसेना – युवासेना आगामी काळात काय रणनीती आखणार, स्थानिक स्वराज्य संस्थेवर शिवसेना पक्षाचा भगवा फडकवणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

, , ,

महाभारत न्युज लाईव्ह

'महाभारत न्यूज लाईव्ह' हे महाराष्ट्रातील अतिशय वेगाने लोकप्रिय होत असलेले एक विश्वासार्ह व जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज नेटवर्क आहे. अल्प कालावधीतच सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या न्यूज नेटवर्कने आपल्या निर्भीड पत्रकारिता, तळागाळातील प्रश्नांवरील भक्कम मांडणी आणि जनसामान्यांच्या हक्कासाठी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे विशेष ओळख निर्माण केली आहे. ग्राउंड लेव्हलवरील वास्तव परिस्थिती पासून ते प्रशासनाच्या दालनापर्यंत सामान्य नागरिकांचा आवाज पोहोचवण्याचे कार्य महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क सातत्याने करत आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, विज्ञान तंत्रज्ञान, सांस्कृतिक, क्रीडा, गुन्हेगारी विश्व, विकासकामे तसेच जनहिताच्या विविध विषयांवरील बातम्या अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी पद्धतीने जनतेसमोर मांडणे हेच महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क चे मुख्य ध्येय आहे. सत्य, न्याय, विवेक आणि जनसेवा या मूल्यांवर आधारित पत्रकारितेमुळे महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क हे आज सामान्य जनतेच्या विश्वासाचे व्यासपीठ बनले आहे. निर्भीड पत्रकारिता • जनतेचा आवाज • न्यायासाठी संघर्ष• महाभारत न्यूज लाईव्ह नेटवर्क | मुख्य संपादक : भारत जगताप मो. ७७२१००८८८५

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button